लोकेश राहुल करतोय आलिया भटच्या मैत्रिणीला डेट?

बॉलिवूड व क्रिकेट यांचे खास कनेक्‍शन आहे. बऱ्याचदा या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींचे नाव एकमेकांशी जोडली जातात. त्यात आता क्रिकेटर लोकेश राहुलच्याही नावाची चर्चा सुरू आहे. या चर्चांनुसार लोकेश राहुल आलियाची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजनला डेट करतो आहे. आकांक्षाने खुलासा केला होता की, राहुलला पहिल्यांदा रणबीर कपूरला भेटवल होत. आकांक्षाच्या या खुलाशानंतप राहुलच नाव तिच्यासोबत जोडल गेल आणि चर्चा सुरू झाली.

त्यातच लोकेश राहुल याच्या एका फोटोवर आकांक्षाने थेट ‘लव्ह’ असे लिहिल्याने चर्चेला आणखी उधाण आले. या संदर्भात खुद्द राहुल याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, अशा स्वरूपाच्या बातम्या लिहिल्या जात आहेत, असे मला कळले. पण मी पेपर वाचतच नाही. त्यामुळे माझ्याबद्दल काय लिहिले जाते आहे हे मला माहिती नाही.

मी माझे वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक ठेवण्यालाच प्राधान्य देतो. मी याला सार्वजनिक चर्चेचा विषय बनवू इच्छित नाही. सध्यातरी माझे सर्व लक्ष क्रिकेटवरच आहे.जेव्हा त्याला तो सिंगल आहे का, असे विचारले. या प्रश्नावर त्याने सांगितले की, मला माहित नाही. जेव्हा मला माहित पडेल तेव्हा तुम्हाला मी फोन करून सांगेन.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×