बेंगळुरू – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरला आहे. त्याने आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यासाठी सरावालाही सुरूवात केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेपूर्वी राहुलला दुखापत झाली व त्याला या मालिकेतून माघारही घ्यावी लागली होती. त्याची दुखापत पूर्ण बरी न झाल्यामुळे त्याला आयर्लंड व इंग्लंडविरुद्धच्या मालिकांनाही मुकावे लागले. आता भारतीय संघ वेस्ट इंडिजला रवाना होणार असून त्या मालिकेसाठी राहुलची संघात वर्णी लागली आहे.
#KLRAHUL backs to nets.Started practicing Ahead of #IndvsWI series. pic.twitter.com/JRhT8A1Ngl
— KLRAHUL TRENDS™ (@KLRahulTrends_) July 16, 2022
अर्थात त्याची तंदुरुस्ती पाहूनच त्याचा समावेश होणार होता, आता त्याने तंदुरुस्ती सिद्ध केल्यामुळे त्याचे संघातील स्थान निश्चित झाले आहे. राहुल दुखापतीवर उपचार करुन घेण्यासाठी जर्मनीला गेला होहात व तेथे त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
यानंतर तो कधी तंदुरुस्त होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता राहुलने सराव करतानाचा आपला फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला व सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.