पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढवणार : ना. नरेंद्र पाटील

मराठी तरूणांनी आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वाई  – केंद्र व राज्य शासनाने अनेक लोकहिताच्या कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. सातारा जिल्ह्यात भाजप मजबूत स्थितीत आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणूकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्ष एकदिलाने काम करणार. पक्षानी संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार, असल्यचे उद्‌गार अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी वाई-महाबळेश्‍वरच्या बॅंक अधिकारी व मराठा युवक यांच्या समन्वय बैठकीनतंर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काढले. भाजप राज्य कार्यकारणी सदस्य अविनाश फरांदे, जिल्हाउपाध्यक्ष काशिनाथ शेलार, सरचिटणीस अनुप सुर्यवंशी, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, यशवंत लेले, अशोक वाडकर, प्रसाद शेवडे, वसंत शिंदे, विजय ढेकाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. नरेंद्र पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागदर्शनाखाली तरूणांना आर्थिक सबल कण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भुमिका घेतली आहे. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडाच्या माध्यमातून राज्यात 2800 तरूणांनी योजनेचा लाभ घेतला आहे. तीस हजारहून अधिक मराठा तरूणांना या योजनेचा फायदा करून दिला जाईल. बॅंक अधिकाऱ्यांनी मराठा तरूणांची अडवणूक करू नयेत.

काही मराठा तरूणांना बॅकांच्या माध्यमातून होणाऱ्या अर्थपुरवठा करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी तालुकानिहाय बॅंक अधिकारी व मराठा तरूण यांच्या समन्वय बैठकांचे आयोजन केल्यामुळे अडचणी दूर होऊन अनेकांना कर्जे मिळू लागली आहेत. जिल्ह्यात फक्त 159 तरूणांनीच योजनेचा लाभ घेतला असून जास्तीत जास्त तरूणांनी लाभ घ्यावा, यासाठी मागदर्शन वर्ग आयोजित करून निवडलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भारताने केलेल्या हवाई स्ट्राईकबद्दल पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेठे वाटून आनंद साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.