लोकसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात ‘या’ राज्यांमध्ये पार पडणार मतदान 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून सर्व पक्षांनी प्रचारासाठी जोरदार कंबर कसली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिग्गज नेते मंडळींनी प्रचारसभेचा धडाका लावला आहे. आता केवळ दोन दिवसातच २० राज्यांमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. केंद्रशासित प्रदेशांमधील ९१ जागांसाठी निवडणूक लढविण्यात येईल.

आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि उत्तराखंड याठिकाणी सर्व जागांसाठी मतदान करण्यात येईल. तर मिझोराम, नागालँड, सिक्कीम, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार या जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडेल. या राज्यांमध्ये लोकसभेची केवळ एकच जागा आहे.

आसाम – तेज़पुर, कालियाबोर, जोरहाट, डिब्रूगढ़, लखीमपुर.
अरुणाचल – अरुणाचल पूर्व, अरुणाचल पश्चिम.
बिहार: औरंगाबाद, गया, नवादा और जमुई.
छत्तीसगढ़: नक्षल प्रभावित बस्तर.
जम्मू-कश्मीर: बारामुला, जम्मू.
महाराष्ट्र: वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपुर, यवतमाल-वाशिम.
ओडिशा: कालाहांडी, नबरंगपुर, बहरामपुर, कोरापुट.
त्रिपुरा: त्रिपुरा पश्चिम.
पश्चिम बंगाल: कूचबिहार, अलीपुरद्वार.
उत्तर प्रदेश: सहारनपुर, कैराना, मुजफ्फरनगर, बिजनौर, मेरठ, बागपत, गाज़ियाबाद और गौतमबुद्ध नगर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.