Lok Sabha Election Phase Voting । लोकसभा निवडणूक 2024 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर फक्त दोन टप्पे उरले आहेत. दरम्यान, पाचव्या टप्प्यातील आजच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 8 राज्यांतील 49 जागांवर मतदान सुरू झाले आहे.
४९ मतदारसंघांमध्ये मतदान Lok Sabha Election Phase Voting ।
देशातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ४९ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात राहुल गांधी, राजनाथसिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, चिराग पासवान अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे. एकूण सात टप्प्यांमधील सर्वांत कमी मतदारसंघ याच टप्प्यात आहेत.
राज्यात मतदान होणाऱ्या १३ मतदारसंघांमध्ये मुंबई व लगतचे मिळून १० मतदारसंघ आणि नाशिक, दिंडोरी आणि धुळे यांचा समावेश आहे. या ठिकाणी मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. मुंबईत मतदान केंद्रांवर बावीस हजारांहून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
695 उमेदवार रिंगणात Lok Sabha Election Phase Voting ।
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्यांतील 49 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात 695 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.