मुंबई – देशात असलेली बरोजगारी, हिंसा, द्वेष यासारखे मुद्दे मीडियामध्ये दिसत नाही. तसेच या राजाचा आत्मा आत्मा, ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांमध्ये आहे. ईव्हीएमध्ये यांचा आत्मा आहे. यांची 56 इंच छाती नाहीच, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. या सभेच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगताही झाली आहे.
यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, प्रियांका गांधी, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरमधील नेत्या महेबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आदी नेते उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रा आम्हाला करावी लागली कारण देशात संवादाचे सिस्टिम देशातील लोकांच्या हातात राहिलेली नाही. बरोजगारी, हिंसा, द्वेष यासारखे मुद्दे तुम्हाला मीडियामध्ये दिसत नाहीत. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली.
कारण कोणताच पर्याय नव्हता. देशाच्या लक्षात आणून देणयासाठी आम्हा सर्वांना 4 हजार किलोमीटर चालावे लागले. सोशल मीडियावरही यांचे नियंत्रण आहे. अमेरिकेतील कंपन्यांवर दबाव असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.
लोकांना वाटते आम्ही राजकीय पक्षाविरोधात लढत आहोत. हे खरे नाही. आम्ही राजकीय पक्षातून लढत नाहीत. हे भारतातील युवकांना समजून घेण्याची गरज आहे. आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी यांच्याविरोधात किंवा भाजपविरोधात लढत नाहीत.
आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकं असेच गेले नाही. ज्या शक्तीचा मी उल्लेख करत आहे त्यांनी या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपसोबत घेतले आहेत, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.