Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आज इंडिया आघाडीची आज भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. । Bharat Jodo Nyay Yatra । Uddhav Thackeray
या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागले आहे. विशेष म्हणजे शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे.
यावेळी सभेला संभोधित करताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “महात्मा गांधी यांनी ४२ साली छोडो भारतचा नारा दिला होता. । Uddhav Thackeray
देशात जी हुकूमशाही टपलेली आहे तिला हद्दपार करण्यासाठी तुम्ही शिवाजी पार्क निवडलं त्याबद्दल आभार मानतो. भाजप हा फुगा आहे. या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्ही केलं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यांनी ४०० पारचा नारा दिला. काय फर्निचरचं दुकान आहे का? खुर्च्या बनवत आहात का? ४०० पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढत आहात का?”, असे प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
“इंडिया झुकेगा नही, इंडिया रुकेगा नही’ – मेहबुबा मुफ्ती
इंडिया झुकेगा नही, इंडिया रुकेगा नही, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 2014 च्या निवडणुकीत 15 लाख अकाऊंटमध्ये येणार सांगून भाजपने मते मागितली, पण असं काही केलं नाही. 2019 च्या निवडणुकीत पुलवामा शहीदांच्या नावाने मते मागितली आणि काहीही केलं नाही, असं म्हणून मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“आता भाजपला चलो जाओ म्हण्याची वेळ आलीये…” – शरद पवार
“भारताच्या स्थितीत बदल घडवण्याची गरज आहे. देशाची ताकद ज्या लोकांच्या हातात आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि सर्व घटकांचा हिरमोड केलाय. तुम्हाला त्यांच्याकरून आश्वन दिलं जातील, पण तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला खूप आश्वसने दिली गेली आहेत. याच मुंबईतून महात्मा गांधींनी चलो जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लावलं होतं. पण आता भाजपला चलो जाओ म्हण्याची वेळ आलीये”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
सभेला दिग्गज नेत्यांची हजेरी –
मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या आजच्या सभेला राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन,
झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.