लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवर मच्छीमारांचा बहिष्कार ?

रत्नागिरी – संपूर्ण कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवानी एलईडी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मच्छीमारांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने जर लवकरात लवकर या अवैध मासेमारीच्या विरोधात कारवाई केली नाही, तर मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंतचा सर्व पारंपरिक मच्छीमार येत्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहे, असे मच्छीमारांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत या विषयावर हर्णै बंदरात महासभा होणार आहे. या महासभेला संपूर्ण किनारपट्टीलगतचा पारंपरिक मच्छिमार बांधव उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गुहागरमध्ये हर्णै दाभोळ गुहागर येथील मच्छिमार बांधवानी एक एलईडी फिशिंग करणारी नौका फिशरीजच्या अधिकाऱ्यांना पकडून दिली. या नौकेवर फिशरीज अधिकाऱ्यांकडून पंचनामा होऊन कारवाई झाली. तरीही अजून शासनाचे डोळे उघडत नाहीत. एलईडी मासेमारीच्या विरोधात संपूर्ण किनारपट्टीला रांनच पेटले आहे. या मासेमारीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे बंदी असूनदेखील राजरोसपणे ही मासेमारी चालत आहे. याच्याच विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पारंपरिक मच्छिमारांनी 26 जानेवारीला या मासेमारी विरोधात उपोषणही केलं होते. या उपोषणात जिल्ह्यातील बहुतांश मच्छिमार सहभागी झाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.