वाघोली : लोहगाव वाघोली रस्ता राज्य महामार्ग अंतर्गत असून या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे नागरिकांना रोज अपघातांना सामोरे जावे लागत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची देखभाल व दुरुस्ती केली नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी दिली आहे.
वाघोली लोहगाव रस्त्यावर लागून अनेक गृहनिर्माण संस्था असून नागरिकांची पुणे ते वाघोली कडे वाघोली ते पुण्याकडे ये जा करणाऱ्यांची संख्या सगळ्यात मोठी आहे. पुण्याच्या लगत असणारा हा रस्ता भाजपच्या काळात वेळोवेळी दुरुस्त व निधी द्वारे चांगला ठेवण्यात येत होता.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात या रस्त्याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले जात असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व वाहनांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. दररोज अपघातामुळे दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने पुणे जिल्हा भाजप च्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा भाजपचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील यांनी सांगितले.
वाघोली ते लोहगाव रस्ता खड्डेमय झाला असून या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांची जोर धरू लागली आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा.
डी. एल. हरगुडे, वैद्यकीय अधिकारी, पुणे