मुंबई – भारतातील रिटेल व्यवसाय आणि ई-कॉमर्स व्यवसाय वाढणार आहे. त्यामुळे वस्तू वाहतूक क्षेत्र म्हणजे लॉजिस्टीक क्षेत्र वेगाने वाढणार असल्याचे डीएचएल स्मार्टट्रकिंग कंपनीचे मुख्य विक्री अधिकारी, संजीव शर्मा यानी सांगितले.
इंडिया ब्रॅंड इक्विटी फाऊंडेशननुसार, 5.5 दशलक्ष किलोमीटर्स इतके जगातील सर्वाधिक लांब रोड नेटवर्क भारतात आहे. तर 2023 पर्यंत भारताची कोल्ड चेन बाजारपेठ 15.4 टक्के दराने वाढत राहील. 2023 मध्ये ही बाजारपेठ 2,293 अब्ज रुपयांपर्यंत वाढेल. मेक इन इंडियामुळे देशातील संघटित रिटेल फूड क्षेत्राच्या वाढीसोबतच,रस्ते वाहतूक पायाभूत सुविधा कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतील, असे शर्मा म्हणाले.
या बाबी ध्यानात घेऊन डीएचएल स्मार्टट्रकिंग कंपनीतर्फे सिंगर इंडिया कंपनीसोबत करार झाला. डिलिव्हरी कालावधी कमी करण्यावर भर देऊन डीएचएल काम करणार आहे. सिंगर इंडियाच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन चंद्रा कंडपाल यांनी सांगितले की, मार्ग अनुकूलनाकरिता इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डेटा आधारित कामाचा फायदा होतो.