फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉक डाऊन

पॅरिस : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशात तीन मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. अशातच मीडिया रिपोर्ट नुसार आता फ्रान्समध्ये देखील 11 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी यासंदर्भात घोषणा केली. इमॅन्युएल मॅक्रो यांनी आपल्या ट्‌विटरवर लिहिले की, देशात 11 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात येत आहे. तसेच 11 मे नंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यावर विचार केला जाईल.

गेल्या चोवीस तासात फ्रान्समध्ये 4 हजार 188 नवे रुग्ण आढळले असून 574 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या फ्रान्समध्ये एकूण रुग्णांची संख्या एक लाख 36 हजार पेक्षा जास्त असून आतापर्यंत सुमारे 15 हजार जणांनी आपला जीव गमावला आहे. तर जगात आतापर्यंत 19 लाख 20 हजार 258 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.