येरवडा (प्रतिनिधी) – शहरातील तिरुपती टॉऊनशिप सोसायटी येथे रहाणाऱ्या राशी दहीकर, योगेंद्र दहीकर यांच्या मायरा दहीकर या पाच वर्षाच्या मुलीचा वाढदिवस विश्रांतवाडी पोलिसांनी साजरा केला.
लॉकडाऊनच्या काळात घरी रहा…सुरक्षित रहा हा संदेश यातून देण्यात आला. वाढदिवस साजरा करताना संपूर्ण सोसायटीमधील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र कदम पोलीस उपनिरीक्षक नरळे पोलीस हवालदार देविदास राऊत, आनंद रासकर, पोलीस शिपाई सुशांत रनवरे आणि नितीन साबळे उपस्थित होते.