लॉकडाऊनमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या

फुलंब्री :  देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे केसकर्तनालय बंद आहेत. त्यामुळे  नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत; म्ह्णून औरंगाबाद जिल्हा फुलंब्री तालुक्यातील शेरोडी बु. गावातील नागरिकांनी घरीच केस कापण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून गावकरी आता काळजी घेताना दिसत आहेत. गावातील सर्व केशकर्तनालय बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. म्हणून त्यांनी घरीच केस कापण्याचा निर्णय घेतला.

१४ तारखेपर्यंत सर्व दुकाने बंद असल्याने केस कापण्याची अडचण निर्माण झाली होती. शिवार केस खूप वाढल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. तसेच कोरोनापासून बचावासाठी आम्ही घरीच केस कापण्याचा निर्णय घेतला असे भास्कर बनकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.