‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला

पुणे – पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना करोनासंदर्भातील नियम व लॉकडाउन संदर्भात प्रश्न विचारण्यात आले यावर त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

त्यांना लॉकडाउन संदर्भात पत्रकरांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’लॉकडाउन सरकारला फार आवडतेय असत म्हणत ते पुढे म्हणाले लॉकडाउनमुळे लोकांचे धंदे गेले तरी सुद्धा या सरकारला लॉकडाउन करायला काय जातंय ? असं म्हणत त्यांनी सरकला सवालही विचारला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने भाजप-मनसेची युती होणार अशी चर्चा होती.  मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसले तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव. माल नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.