नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन असल्यामुळे इंधनाच्या मागणीत घट झाली आहे. दिल्लीत पेट्रोल डिझेल आणि सीएनजीच्या मागणीत ८५ ते ९० टाक्यांनी इंधनाची मागणी घेतली आहे. हीच परिस्थिती संपूर्ण जगात निर्माण झाली आहे. म्हणून जागतिक स्थरावर देखील इंधनाच्या मागणीत घेत दिसून आली आहे. घटत्या इंधन मागणीमुळे दिल्ली सरकारच्या महसुलात देखील घट झाली आहे. खाजगी वाहनाबरोबरच व्यावसायिक वाहनांना देखील बंदी असल्यामुळे त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पडत आहे. फक्त अत्यावश्यक सेवा घेऊन जाणारी आणि जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारी व्यावसायिक वाहने चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सध्या इंधनाच्या मागणीत घट झाल्यामुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ५२० इंधन स्थानकांपैकी ४६५ इंधन स्थानकाच्या सेवा बंद केल्या आहेत. तर ५५ स्थानकांवर मर्यादित सेवा देण्यात येत आहे. दिल्लीतील 400 हून अधिक पेट्रोल पंप स्टेशन कार्यरत आहेत. परंतु त्यापैकी काहीच पंप सुरु आहेत. घटत्या इंधन मागणीचा परिणाम कर्मचाऱ्यावर सुद्धा दिसून येत आहे. एका पंपावर फक्त २ ते ३ कर्मचारीच कार्यरत आहेत.
पेट्रोल पंप चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जे पंप आत्यावश्य्क सेवेमध्ये येत नाहीत, ते पंप बंद करण्यात आले आहेत.
दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बिजलानी यांनी सांगितले कि, पोलिस, रुग्णालये, अत्यावश्यक सेवांशी संबंधित विभाग आणि आवश्यक वस्तू वाहतूक करणार्या वाहनांना लॉक-डाउनमध्ये रस्त्यावर चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. माध्यम वाहनांना फिरण्याची परवानगी आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष निश्चल सिंघानिया म्हणाले की, पेट्रोलमध्ये दहा टक्के मागणी असून डिझेलची मागणी केवळ 15 टक्के आहे. सामान्य दिवसात दिल्लीत दरमहा 100 दशलक्ष लिटर पेट्रोल आणि 8 कोटी लिटर डिझेलचा वापर होतो.