हैदराबाद : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तेलंगणात सरकाने लॉकडाऊन आणखी कडक केलं आहे. सरकारने एक प्रसिद्धिपत्रक जारी करत लॉकडाऊन ७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान तेलंगणात आतापर्यंत ८५८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
तर रविवारी नवे ४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. सार्वधिक ४५० कोरोनाबाधित एकट्या हैदराबाद आढळून आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सोमवापासून फूड डिलिव्हरी अॅपच्या संचालनास परवानगी नसेल असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.
कर्नाटकात ३ मेपर्यंत लॉकडाउन निर्बंध
कर्नाटक सरकाने राज्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायम असणार असल्याची घोषणा केली आहे. कर्नाटकचे कायदा मंत्री जे.सी. मधुसस्वामी म्हणाले की, कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने कोणत्याही प्रकारची सूट न देता राज्यात ३ में पर्यंत लॉकडाऊन कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज कर्नाटक मंत्रिमंडळाची लॉकडाऊन संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यावेळी राज्यात लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसून लॉकडाऊन ३ में पर्यंत लागू राहणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी सांगितलं.