शिरूर शहरात 19 जुलै पासून लॉकडाऊन !

शिरूर : शिरूर नगरपरिषद आणि शिरूर ग्रामीण व तर्डोबावाडी या भागात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी दिनांक 19 जुलै पहाटे 1 पासून ते 28 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत हे तीनही क्षेत्र संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करीत असल्याचे प्रांत अधिकारी संतोष कुमार देशमुख आदेश दिले असल्याची माहिती शिरूर नगरपरिषद मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यातून शिरूर शहरात येण्यासाठी संपूर्णपणे प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र संपूर्ण शिरुर नगर परिषद क्षेत्र, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत मधील सोसायटी शिक्षक कॉलनी, ओम रुद्र सोसायटी ,सावतामाळी नगर ,बालाजी एम्पायर , शिव रक्षा कॉलनी ,जाधव मळा, बाबुराव नगर ,आणि तर्डोबवाडी ग्रामपंचायत मधील बाफना मळा क्षेत्र प्रतिबंधित केलेली आहेत.

शिरूर शहरातील व परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील किराणा दुकाने किरकोळ व ठोक विक्रेते व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक 19 जुलै पासून ते 23 जुलै पर्यंत संपूर्णतः बंद राहणार आहेत. त्यानंतर 24 जुलै 28 जुलै या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील. सर्व दुकाने व आस्थापना बंद राहणार आहे.

झोमॅटो, स्विगी तत्सम ऑनलाईन  वरून मागवले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा पूर्णतः 19 जुलै ते 28 जुलै पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच सार्वजनिक खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा उद्याने बगीचे हे सर्व बंद राहतील तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वाक इव्हिनिंग वाक प्रतिबंध करण्यात आला आहे.

उपहार ग्रह, बार ,लॉज ,हॉटेल्स रिसॉर्ट, बाजार, मार्केट संपुर्णतः बंद राहणार आहे. सर्व केशकर्तनालय सलुन ब्युटी पार्लर दुकानेही बंद राहणार आहेत. सर्व किरकोळ व ठोक विक्री चे ठिकाण आडत भाजीमार्केट फळविक्रेते आठवडे व दैनिक बाजार फेरीवाले हे सर्व ठिकाण 19 जुलै ते 23 जुलै पर्यंत समोर पूर्णतः बंद राहतील. तसेच 24 जुलै ते 28 जुलै या कालावधीत किरकोळ विक्री चे ठिकाणे भाजी मार्केट ,फळविक्रेते, दैनिक बाजार या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

मटन चिकन अंडी मासे इत्यादी विक्री 19 जुलै ते 23 जुलै संपूर्ण बंद तर 24 जुलै ते 28 जुलै या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. असेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

तथापि औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रतिबंध क्षेत्राबाहेरील अधिकारी  कर्मचारी यना कामावर उपस्थित राहता येणार असून,नगर जिल्ह्यातून शिरूर शहरात कोणत्याही कारणासाठी येण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे असेही यासाठी शिरूर प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी आदेश दिली असल्याचे यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुद्ध कोणती ही व्यक्ती संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 यांची कलमे 51 ते 60 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यास पात्र राहतील असेही यावेळी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.