महाराष्ट्रात लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवला; कठोर निर्बंध लागू

१ जूनपर्यंत वाढ करण्यास मंत्रिमंडळाची एकमुखी मान्यता

मुंबई   -राज्यात लॉकडाऊनला १ जूनपर्यंत वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी बैठकीत एकमुखाने मान्यता दिली. राज्यातील करोना नियंत्रण यासह संभाव्य तिसरी लाट आल्यास त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी लागणारा वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला. याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील असे स्पष्ट करण्यात होते.   

 

त्याप्रमाणे राज्यातील लॉकडाऊन १ जूनपर्यंत  वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संबंधी एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध १ जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. राज्यातील लॉकडाऊन  १ जूनपर्यंत  वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संबंधी एक परिपत्रक काढण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून राज्यात लागू असलेले कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. एप्रिल महिन्यात ६८ हजारांपर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णवाढ घटून ४० हजारांपर्यंत आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या घटली आहे. भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवस वाढावा अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली होती.

ब्रेक द चैन नवी नियमावली

1) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक

2) महाराष्ट्रातून घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्या RTPCR रिपोर्ट बंधनकारक असणार

3) एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवाशांची परवानगी

4) दूधाचे कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार

5) बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थनानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा

6)मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं प्रवेश

7)परराज्यातून मालवाहूतक करणा-यांना RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावा तो 7 दिवस ग्राह्य  धरणार

 

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.