रोम – करोनाग्रस्त इटालितील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय त्या देशाने घेतला आहे. आता तेथे 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू असेल. हा निर्णय अवघड आणि कठीण आहे पण तो घेण्याखेरीज गत्यंतर नाही असे पंतप्रधान गीयुसेप्पे कॉन्ते यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारने पुर्ण राजकीय जबाबदारीने हा निर्णय घेतला आहे असे त्यांनी काल जाहीर केले आहे.
इटाली हा करोनाचा सर्वात अधिक फटका बसलेला युरोपातील देश आहे. आजही त्या देशातील करोनाचा प्रसार थांबलेला नाही आणि त्या देशांतील मृत्यूचेही प्रमाण थांबलेले नाही. आता त्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दीड लाखा पर्यंत गेला असून मृतांचा आकडाही 18 हजार 849 इतका झाला आहे. आजच्या घडीला करोनाचे सर्वाधिक बळी त्या देशात गेले आहेत.