तिरूअनंतपूरम – करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनचा सकारात्मक प्रभाव पाहता केरळमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला आहे. केरळमध्ये आता लॉकडाउन 23 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
केरळमध्ये लॉकडाउन 16 मे पर्यंत होता. मात्र करोनाचा फैलाव आणि रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आता एका आठवड्यांचा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिरुअनंतपुरम, एर्नाकुलम, त्रिशूर आमि मलाप्पुरममध्ये ट्रिपल लॉकडाउन लावला जाणार आहे. या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.