पणजी – गोवा राज्यात 31 मे रोजीपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. यासंदर्भातील निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरु असतील.
दरम्यान राज्यात वाढत्या करोनाबाधितांची संख्या पाहता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. याआधी गोव्यात 9 मे पासून ते 23 मे पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता.
गोवा सरकारने वैद्यकीय सेवेस परवानगी आहे. तसेच किराणा मालाची दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त रेस्टॉरारंटद्वारे डिलिव्हरीला परवानगी असेल. ज्यात ऑर्डर घेण्यासाठी सकाळची वेळ निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान आता 23 मे रोजी संपणारा कर्फ्यू आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यावेळीही पूर्वी जारी केलेले कडक नियमच कायम ठेवण्यात आले आहे.