नाशिक – राज्यात करोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पारेगावमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्यामुळे येथे पाच दिवसांचा कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे.
करोना संसर्गाचे रुग्ण वाढू नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पारेगावात पाच दिवसांचा लाॅकडाऊन लागू करण्यात आला असून याकाळात गावातील सर्व दुकानं बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पारेगावात 10 पेक्षा जास्त कोरोनाबधित रूग्ण आढळले आहेत. तसेच ज्या गावात दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळतील तेथे लाॅकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे येवला प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.