नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे.
या दिशानिर्देश नुसार प्रत्येकाला मास्क वापराची सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या लॉकडाऊनला ५.० असं न संबोधता अनलॉक १ असं संबोधण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे.
Lockdown to continue in Containment zones till June 30, only essential activities allowed: MHA #UNLOCK1 pic.twitter.com/ViPB0nfpJY
— ANI (@ANI) May 30, 2020
कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत. रात्री 9 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रवास बंदीही उठवण्यात आली असून, पास व्यतिरिक्तही राज्याबाहेर प्रवास करू शकणार आहेत. शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला आहे. सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
काय बंद राहणार?
आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,सिनेमा हाॅल्स, जिम, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम.
कंन्टेन्मेंटमध्ये काय आहेत नियम?
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या नियमांनुसार जिल्हाधिकारी आपआपल्या जिल्ह्यात नियम जारी करू शकतील. कन्टेन्मेंट झोन्समध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे. या झोनमधील नागरिक इतर ठिकाणी प्रवास करू शकणार नाहीत. तर, या झोनमध्ये ट्रेसिंग आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. हा लॉकडाऊन मुख्यत्वे तीन टप्प्यामध्ये असणार आहे.
Phase I: Religious places and places of worship for public; hotels, restaurants and other hospitality services; and shopping malls; will be permitted to open from June 8, 2020. Govt to issue guidelines in this regard #UNLOCK1 pic.twitter.com/9xlokggRsa
— ANI (@ANI) May 30, 2020
पहिला टप्पा
धार्मिक स्थळं, सार्वजनिक प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि इतर सेवांसह शॉपिंग मॉल 8 जूनपासून खुले होणार.मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालया जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळेल.
दुसरा टप्पा
शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था,कोचिंग राज्य सरकारांशी चर्चा करुन जुलै 2020 मध्ये खुले करता येणार आहेत. राज्य आणि केंद्राच्या परवानगीनंतर उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, यासाठीची नियमावलीही जारी करण्यात येणार आहे.
तिसरा टप्पा
गृहमंत्रालयाने निश्चित केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो रेल्वे, सिनेमागृहं, व्यायामशाळा, स्विमिंगपूल, बार आणि इतर तत्सम ठिकाणं खुली करण्याविषयी तिसऱ्या टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे. याच्या तारखा कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून नंतरच घोषित केल्या जातील.