अकोला: पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड व नागपूर पाठोपाठ आता अकोला जिल्हाही 3 दिवस बंद राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले आहेत.
उद्या पासून 3 दिवस अकोला जिल्हा बंद असून 22 ते 24 मार्च पर्यंत हा बंद असणार आहे.
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील.
दरम्यान, आज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 63 वर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले एकूण 11 रुग्ण आहेत. त्यातील 10 मुंबईचे आणि 1 पुण्याचा आहे. तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 8 जणांना परदेशातच संसर्ग झाला होता, असे राजेश टोपे यांनी सांगितले.