करण जोहरने आपल्या “रॉकी और रानी की प्रेम कहानी’या आगामी सिनेमाचे काम सुरू केले आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट हे मुख्य कलाकार असलेल्या या सिनेमाच्या शूटिंगसाठी लोकेशन शोधायला सुरुवात झाली आहे, असे करण जोहरने सोशल मीडियावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एक लोकेशन शोधायला बाहेर पडले असतानाचा त्याने एक सेल्फीदेखील पोस्ट केला आहे. अलीकडेच रणवीर सिंहने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 6 जूनला या सिनेमातील आपली भूमिका आणि भूमिकाच्या नावाबाबत माहिती दिली होती.
या सिनेमाचे शीर्षक रणवीर आणि आलियाने मिळून ठरवले आहे. “रॉकी और रानी…’च्या माध्यमातून रणवीर आणि आलिया दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत.
पहिल्यांदा हे दोघे 2019 मधील “गली बॉय’मधून एकत्र आले होते. या दोघांचेही यावर्षी एकापाठोपाठ एक अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. रणवीर सिंह “सूर्यवंशी’मध्ये दिसणार आहे. याशिवाय “83′ आणि “सर्कस’मध्येही तो दिसणार आहे.
तर दुसरीकडे आलिया भट “आरआरआर’मध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे. तिचा “गंगूबाई काठियावाडी’ आता पोस्ट प्रॉडक्शनच्या प्रोसेसमध्ये आला आहे.