शिरुर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना ८० टक्के रोजगार

शिरूर: क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या शिरुर तालुक्यातील स्थानिकांना ८० टक्के रोजगार कायद्याची अंमलबजावणी करावी या आंदोलनाला अखेर यश मिळाले असुन आता शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणारआहे. आसे आदेश कामगार मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. महाराष्ट्रात उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थानिकांना ८० टक्के रोजगार देण्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी संदर्भात शिरुर तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना ८० टक्के रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी वेळोवेळी आंदोलन केले होते. याबाबत तिन महीन्यापुर्वी निवासी जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक झाली होती. कागदपत्रे परिपत्रके उपलब्ध करून त्यांनी यासंदर्भात सरकारला व औद्योगिक वसाहतीतील प्रमुख व कामगार आयुक्त यांना जाब विचारला होता. दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजी क्रांतिवीर प्रतिष्ठानने एमआयडीसी बंद चे आंदोलन पुकारले होते. याची दखल मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी घेतली व आज त्या संदर्भात पुण्यात शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून रांजणगाव एमआयडीसी मधे जिल्हा उद्योग केंद्र, एम्प्लॉयमेंट विभाग व एमआयडीसी यांनी संयुक्तपणे तालुक्यातील तरुणांची नोंदणी करून घेण्यासाठी नोंदणी विभाग सुरू करुन तालुक्यातील सर्व कंपन्यांमध्ये त्यांना सामावून घेण्यासंबंधीचे आदेशच  भेगडे यांनी दिले. तसेच शिरुर तालुका आणि लगतच्या तालुक्यातील तरुणांनां प्राधान्यक्रम देण्याचेही बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यावेळी एमआयडीसी मधे तरुणांना रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे निर्देश ही जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांना दिले. यावेळी क्रांतिवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय पाचंगे, आमदार बाबुराव पाचर्णे, सतीश पाचंगे कार्यकारी अध्यक्ष भाजपा पुणे, सागर दरेकर, बाळासाहेब लांडे, शिवाजी भुजबळ भाजपा कार्यकारणी सदस्य, राजेश लांडे, विजय दरेकर, अमोल दरेकर, आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक तरुणांसाठी शिरुर तालुक्यातील तरुणांनां रोजगार-नोकरी ची ससेहोलपट आता थांबणार असुन हे माॅडेल संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उपयोगी पडणार असल्याचे संजय पाचंगे यांनी सांगितले.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×