सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली
मुंबई- मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील बफरला धडकली आहे. सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. शेवटचे स्थानक असल्याने लोकल ट्रेनचा वेग कमी होता आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी स्थानकात आलेली एक लोकल ट्रेन बफरलाच धडकली. या अपघातामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. लोकल ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातानंतर ही लोकल ट्रेन कारशेडला रवाना करण्यात आली आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र, मध्य रेल्वेने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.