अजित पवारांच्या सभेत उपस्थिती, पंढरपुरातील नेत्याचं कोरोनामुळे निधन

पाटील यांच्या निधनामुळे मंगळवेढा तालुक्यात हळहळ

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत त्यांनी हजेरी लावली होती. पाटील यांच्या निधनामुळे मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे याच बोराळे गावात कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहेत. बोराळे गावात आतापर्यंत 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेक नागरिक हे अजित पवारांच्या जाहीर सभेत सहभागी झाले होते. यामुळे बोराळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विविध प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारसभेला अजित पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. या प्रचारसभेला माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील हे देखील उपस्थित होते.

9 एप्रिलला सभेपूर्वी बाबासाहेब भीमराव पाटील यांनी आरोग्य तपासणी केली होती. तसेच त्यांना कोरोनाची लक्षण दिसत असल्याने पाटील यांनी कोरोनाची चाचणीही केली होती. पाटील यांना या सभेच्या वेळी त्रास जाणवत होता. ही सभा संपल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री पाटील यांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.