देऊर येथे जबरी घरफोडी

साडेचार लाखांचा ऐवज लंपास; वाठारस्टेशन पोलिसांपुढे आव्हान

पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का?
वाठार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चोरीच्या व इतर गुन्ह्यांच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली असून मध्यंतरीच्या काळात वीज वितरण महामंडळाच्या ट्रान्सफार्मरच्या चोऱ्या, नांदवळ येथील घरफोडी व इतर लहान मोठ्या चोरीचे प्रकार घडले आहेत. तसेच यापूर्वी झालेल्या चोरीच्या तपास अजुन वाठार पोलिसांना लावता आलेला नाही. तोवर चोरट्यांनी पोलिसांना एक नवीन आव्हान उभे केले आहे. तसेच पंचक्रोशीतील जनतेला वाठार पोलीस स्टेशनच्या सुरक्षतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.याबाबत पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का?  

वाठार स्टेशन – देऊर, ता. कोरेगाव येथील सिमा मधुकर पुजारी (वय 47) यांच्या घराच्या खिडकीत हात घालून आतून कडी कोयंडा काढून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून साडे चार लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवार दि. 23 मे च्या रात्रीच्या सुमारास घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी वाठार पोलिसांच्या पुढे आव्हान निर्माण केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिमा मधुकर पुजारी (वय -47) या देऊर, ता.कोरेगाव व त्यांच्या चुलत बहीण सुनिता बाळासाहेब शेंडे रा.बनवडी या दोघी बहिणी एकाच रूम मध्ये झोपल्या होत्या. झोपण्यापूर्वी सीमा पुजारी या रात्री पावणे बारापर्यंत आपल्या चुलतीच्या घरी काही कामानिमित्त गेल्या होत्या. त्या ठिकाणाहून काम आटपून त्या परत घरी आल्या त्यावेळी त्यांची चुलत बहीण सुनिता शेंडे या घरात झोपलेल्या होत्या. त्यांनी कडी वाजवून तिला उठवले व त्या दोघी मिळून घरात झोपल्या. त्यानंतर पहाटेच्या दरम्यान शेजारी राहणारे चुलत बहिणीचे मालक रमेश महादेव भांडवलकर यांनी मला फोन केला की, माझ्या घराला बाहेरून कडी लावलेली आहे ती उघडा मग त्या त्यांची दाराची  कडी उघडण्यासाठी उठल्या व आपले स्वतःचे दार उघडायला गेले असता त्यांना आपले स्वतःचे दार उघडे दिसले. त्यावरून त्यांच्या असे लक्षात आले की, आपल्या घरात चोरी झाली आहे मग त्यांनी ताबडतोब घरात जाऊन पाहिले असता गोदरेज कपाट उचकटून सर्व साहित्य विस्कटलेले दिसले.

डब्यातील सोन्याच्या वस्तू काढून त्याची पाकिटे तिथेच फेकून दिली होती. तसेच कपाटाचे ड्रॉव्हर देखील काढून खाली फेकले होते. स्वयंपाकगृहात पाहिले असता.चार अंगठ्या, कर्णफुले, दोन गंठण, नेकलेस, मोहनमाळ, सोन्याची चेन, रोख रक्कम पाच हजार पाचसे असे मिळून साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी आजूबाजूला राहणाऱ्या घरांना बाहेरून कड्या घातल्या होत्या. चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली असुन अधिक तपास वाठार स्टेशन पोलीस करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×