मुंबई – यंदाच्या आर्थिक वर्षातील पतधोरण आज रिजर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. रिजर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. या निर्णयामुळे आता रेपो दर ६ टक्क्यांवरून ५.७५ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे सामान्य जनतेसाठी कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जाचा हफ्ता कमी होणार आहे. तसेच नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्जाचे दर कमी होतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
तसेच रिव्हर्स रेपो दर हा 5.50 टक्के तर बँक रेट 6 टक्के इतका राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
RBI cuts repo rate by 25 basis points, now at 5.75% from 6%. Reverse repo rate and bank rate adjusted at 5.50 and 6.0 per cent respectively. pic.twitter.com/greB9paac3
— ANI (@ANI) June 6, 2019
यांना होणार फायदा
घर तसेच वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांमध्ये कपात होणार. रेपो रेट मध्ये कपात झाल्याने नवीन कर्ज घेणाऱ्यांना स्वस्तात मिळेल.
रेपो रेट म्हणजे काय ?
सार्वजनिक बँका आपल्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून पैसे घेते, त्या पैशांवर रिजर्व्ह बँकेकडून जो दर आकारला जातो त्यास रेपो रेट असे म्हणतात.
WATCH: RBI Governor Shaktikanta Das addresses the media in Mumbai https://t.co/qnYv69newC
— ANI (@ANI) June 6, 2019