विकासकांची मागणी; प्रकल्प पूर्तीसाठीचा कालावधीही वाढवावा
पुणे – अगोदरच मंदीची परिस्थिती असताना करोनामुळे बांधकाम क्षेत्र ठप्प झाले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बांधकाम क्षेत्राला सवलती देण्याची गरज असल्याचे क्रेडाई या विकासकांच्या संस्थेने म्हटले आहे.
क्रेडाईने गृहनिर्माण मंत्रालयाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विकसकांना दिलेल्या कर्ज परतफेडीसाठीची मुदत तीन महिन्यांनी लांबवावी. प्रकल्प पूर्तीसाठीचा कालावधी वाढवून देण्यात यावा. त्याचबरोबर अतिरिक्त भांडवल सुलभता निर्माण करावी. या क्षेत्राचे काम ठप्प झाल्यामुळे ग्राहकाकडून मिळणारा उत्पन्नाचा स्रोत कमी झाला आहे. घर खरेदी करणाऱ्यांकडून कर्जाचे हप्ते थकू लागले आहेत. कच्चा माल आणि कामगार मिळत नसल्यामुळे प्रकल्पावरील काम थांबले आहे.
क्रेडाईने असे म्हटले आहे, की रेरा कायद्यातील कलम 6 च्या अनुषंगाने नियंत्रकांना विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रकल्प पूर्तीचा कालावधी वाढवून देण्याचे अधिकार असतात. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यामध्ये समावेश करण्यात यावा.