रियल इस्टेट क्षेत्राला 100 अब्ज डॉलरचे कर्ज

67 टक्के कर्ज सुरक्षित; ते 33 टक्के कर्जावर दबाव

मुंबई – बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्राने रिअल इस्टेट क्षेत्राला 100 अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. त्यातील 67 टक्के कर्ज सुरक्षित असून उरलेल्या कर्जावर मात्र काही प्रमाणात दबाव असल्याचे मत ऍनारॉक या संस्थेने व्यक्त केले आहे.

या संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रिअल इस्टेट क्षेत्राला दिले गेलेले 100 अब्ज डॉलरचे (एक डॉलर म्हणजे 75 रुपये) सुरक्षित राहावे याकरिता बॅंका प्रयत्न करीत आहेत. 15 टक्के म्हणजे 15 अब डॉलरच्या कर्जावर अंशतः दबाव आहे. मात्र 18 टक्के कर्जावर जास्त दबाव असल्यामुळे बॅंक याबाबत चिंता करण्याची शक्‍यता आहे.

बॅंक व्यतिरिक्त विगर बॅंकिंग वित्तीय संस्था, गृह वित्त संस्था इत्यादीचे रिऍल्टी क्षेत्राला दिलेल्या कर्जाचे प्रमाण 63 टक्के इतके आहे. या क्षेत्राला बॅंकांनी दिलेल्या कर्जाचे प्रमाण 37 टक्के इतके आहे. एकूण परिस्थिती पाहता बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांनी दिलेल्या कर्जाकडे रिझर्व बॅंकेचे जास्त लक्ष असल्याचे दिसून येते. एकूण परिस्थिती पाहता रिऍल्टी क्षेत्राची परिस्थिती सर्वसाधारणपणे ठीक आहे. कारण बहुतांश कर्ज सुरक्षित असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा या क्षेत्रावर परिणाम झाला असला तरी बॅंका आणि रिअल इस्टेट क्षेत्राने यातून योग्य पद्धतीने वाटचाल केली असल्याचे दिसून येते. आगामी काही काळात या क्षेत्रातील अनुत्पादक मालमत्ता वाढू नये यासाठी सर्वांनी सावध राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.