पुणे – हायवा ट्रकचा टायर फुटल्याने खडी उडून दोन शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी सकाळी खराडी येथे घडली. याप्रकरणी चंदनननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
देवांश चव्हाण(14,रा.खराडी) आणि प्रथमेस देसाई(15,रा.विश्रांतवाडी) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशीरा हायवा ट्रक चालाविरुध्द गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दशरथ चव्हाण हे त्यांचा मुलगा देवांशला दररोज सकाळी दुचाकीवर खराडी येथील शाळेत सोडतात. येताना तो मित्र प्रथमेश देसाईसोबत बसने घरी येतो. तो दुपारी साडेअकराच्या सुमारास प्रथमेश सोबत रेडीशन हॉटेलसमोरुन बस थांब्याकडे चालला होता. यावेळी भरधाव वेगात माती व खडीने भरलेला हायवा ट्रक रस्त्याने चालला होता. यावेळी ट्रकचा अचानक टायर फुटला. टायर फुटल्याने रस्त्यावर खडी पडून ती दोघांच्याही तोंडावर आणी डोक्यावर उडून लागली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.