‘यामुळे’ दिले नाही लालकृष्ण आडवाणी यांना उमेदवारी – नितीन गडकरी

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रतीक्षेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपने १८२ उमेवारांची नावे अंतिम जाहीर केली. नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली परंतू भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना पक्षाने जाहीर केलेल्या यादीत समावेश न केल्यामुळे आडवाणी यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर भाष्य करत नितीन गडकरी यांनी आडवाणी हे आमच्या प्रेरणास्थानी असून त्यांचे तिकीट कापण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. आडवाणी यांचे वाढते वय आणि तब्बेतीच्या कारणामुळे संसदीय बोर्डाने हा निर्णय घेतला असल्याचे  त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी हे भाजपातील ज्येष्ठ नेते असून पक्षाच्या राजकीय प्रवासात त्यांनी दिलेले योगदान मोठे असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी म्हंटले. त्यामुळे पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असून तिकीट दिले नाही म्हणून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले, असे होऊ शकत नाही. प्रत्येक पक्षात बदल हा होत असतोच त्यामुळे हा त्याचाच एक भाग आहे. वाढते वय आणि तब्बेतीच्या कारणामुळे संसदीय बोर्डाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांसारख्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र यामध्ये गांधीनगरमधून अमित शहा यांना उमदेवार देण्यात आली. १९९८ पासून गांधीनगर हा लालकृष्ण अडवाणी यांचा मतदार संघ होता. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांना सक्तीची निवृत्ती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here