पशुवैद्यकीय विभागामुळे कबुतराला जीवदान  

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका पशू वैद्यकीय विभागाच्या तत्परतेमुळे पिंपरीत एका जखमी कबुतराला जीवदान मिळाले. शहरातील पशू, पक्षी यांच्यावर उपचारासाठी व त्यासंबधी विविध उपाययोजनांसाठी महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कार्यरत आहे. मात्र, मोकाट कुत्रे व जनावरांवरून सातत्याने या विभागाला टीकेचे धनी व्हावे लागते.

मात्र, या विभागाच्या तत्परतेमुळे अनेक पशू-पक्ष्यांवर तातडीने उपचारही होतात. तसेच एक उदाहरण पिंपरीत अनुभवायला मिळाले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात एक जखमी कबूतर
आढळून आले. पंखांना दुखापत झाल्याने त्याला उडता येत नव्हते.

त्याची माहिती मिळताच तातडीने तिथे येऊन अनिल मोझे व वसंत वावरे या कर्मचाऱ्यांनी कबुतराला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांनी त्याच्यावर औषधोपचार करून पालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयात पाठवून दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.