‘सत्यमेव जयते’; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई – 13 व्या विधानसभा निवडणूकीसाठी आज 288 मतदारसंघातील मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीमुळे उमेदवारांच्या मनात धाकधुक निर्माण झाली असून निवडणूकीत कुणाला जनादेश मिळणार याबाबत अवघ्या महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. दिवाळीआधीच विजयी उमेदवारांचे फटाके फुटणार आहेत. मतमोजणीवर सीसीटीव्हीचा वॉच राहणार असून मतमोजणीसाठी सुमारे 25 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

– परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा प्रभाव केले आहे. या विजयानंतर ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.  

– पुणे : कोथरूड मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील यांची २३ हजारांनी आघाडी.

– वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला. 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी, शिवसेनेच्या विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव.

– परळीत लाठीचार्ज, धनंजय मुंडे यांच्या विजयाच्या बातमीने कार्यकर्ते अतिउत्साही; कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज

– भाजपाचे राज्यमंत्री बाळा भेगडे पराभूत, राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंची बाजी

– राष्ट्रवादी-काँग्रेस मिळून पुढेच निर्णय घेतील. परंतु, आम्ही निश्चितपणे शिवसेनेबरोबर जाणार नाही – शरद पवार.

– जवळपास अशोक पवार यांचा विजय निश्चित 

– राष्ट्रवादीचे अँड. 22 फेरीअखेर अशोक पवार यांना आघाडी 29700

– सत्ता येते, सत्ता जाते पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात- शरद पवार

– पर्वती : माधुरी मिसाळ विजयी. अश्विनी कदम 51,633 तर माधुरी मिसाळ 86087 मते.  

– ‘220 के पार’ हे जनतेने स्वीकारले नाही- शरद पवार

– साताऱ्यात जाऊन जनतेचे आभार मानणार- शरद पवार

– शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील सलग सातव्यांदा विजयी. राधाकृष्ण विखे यांना ९६ हजार ९९५ मते तर सुरेश थोरात यांना २८ हजार मते. विखे ६९ हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी.

– बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांचा भरपावसात फुगडी डान्स करून जल्लोष.

– पुणे : खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय. शिवसेनेच्या गडाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाडले खिंडार. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरेंचा पराभव.

– माळशिरस : चोविसाव्या फेरीअखेर भाजपाचे राम सातपुते 6 हजार मतांनी विजयी घोषित. 

– नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी अणुशक्तीमधून विजय मिळवला आहे.  

– सोलापूर शहर मध्य : कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर.

– सोलापूर दक्षिण : सहकारमंत्री आणि भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर.

– डोंबिवली : आमदार रवींद्र चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर. 

– भोर : राष्ट्रवादीचे संग्राम थोपटे 10,324 मतांनी विजयी. संग्राम थोपटे ९९०२३ मते आणि कोंडे ९३१२८ मते. 

– सातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्र्वादीचे श्रीनिवास पाटील 41,255 मतांनी आघाडीवर. उदयनराजे भोसले 2,11,495 तर श्रीनिवास पाटील 2,52,750 मते.

– औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंचे जावई पराभूत. 

– बोरीवलीमध्ये नोटाला १० हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर लातुरमध्येही अनेक मतदारांची नोटाला पसंती. लातुरमध्येही नोटाला १६ हजार मते. 

न्हावरे-शिरूर : एकणिसाव्या फेरीअखेर अशोक पवार २४६१३ मतांनी आघाडीवर. अशोक पवार ९९१२८ तर बाबूराव पाचर्णे ७४८७५ मते. 

– लातूर ग्रामीण : धीरज देशमुख यांची 64 हजार मतांनी आघाडी. 

– राम शिंदे यांना पराभव दिसताच मतदान केंद्रातुन काढला काढता पाय.

– पुणे : आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा मोठा विजय. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखिले यांचा 67,815 फरकारने पराभव. 

– औरंगाबाद: सर्व 9 जागांवर महायुती आघाडीवर

– माण : पंधराव्या फेरीअखेर जयकुमार गोरे यांची 13637 मतांनी आघाडी. भाजपचे जयकुमार गोरे 63382, शिवसेनेचे  शेखर भाऊ गोरे 20630 तर अपक्ष प्रभाकर देशमुख 49745 मते.

– पाटण : एकविसाव्या फेरीअखेर शंभूराज देसाई ७,७०२ मतांनी आघाडीवर. शंभूराज देसाई ६३८८८ तर सत्यजित पाटणकर ५६१८६ मते. 

– यवतमाळ जिल्ह्यात कोण आघाडीवर?

वणी : भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार १६५५ मतांनी आघाडीवर.
आर्णी : काँग्रेसचे अ‍ॅड. शिवाजीराव मोघे ४३०६ मतांनी आघाडीवर.
राळेगाव : भाजपचे अशोक उईके ३७९५ मतांनी आघाडीवर.
यवतमाळ : काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर ३१२५ मतांनी आघाडीवर.
दिग्रस : शिवसेनेचे संजय राठोड १७ हजार मतांनी आघाडीवर.
पुसद : राष्ट्रवादीचे अ‍ॅड. इंद्रनील नाईक ११ हजार ३१४ मतांनी आघाडीवर.
उमरखेड : भाजपचे नामदेव ससाने २८०६ मतांनी आघाडीवर.

– परळीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी. भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव

– न्हावरे-शिरूर : सतराव्या फेरीअखेर 25180 मतांनी अशोक पवार आघाडीवर. अशोक पवार यांचा जवळपास 25 हजार मतांनी विजय मानला जात आहे. 

– सिंदखेड : भाजपचे उमेदवार आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल विजयी झाले आहेत.

– पळूस-कडेगाव : काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांचा १ लाख ५५ हजार मतांनी विजय झाला आहे.

– शिवाजीनगर : बाराव्या फेरीत भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 5 हजार 181 मतांनी आघाडीवर. सिद्धार्थ शिरोळे 35578 तर काँग्रेसचे दत्ता बहिरट 28397

– कर्जत जामखेड : तेराव्या फेरीअखेर रोहित पवार 24312 मतांनी आघाडीवर. राम शिंदे 48102 तर रोहित पवार 66124 मते मिळाली आहेत. 

– संगमनेर : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा ३५,००० मतांनी विजयी

– सातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील एक लाख मतांनी आघाडीवर. उदयनराजे भोसले 1,82,099 आणि श्रीनिवास पाटील 2,13,875 यांना मते. 

– सातारा जावळी : शिवेंद्रराजे भोसले 21,759 आघाडीवर. दीपक पवार 14,569 तर शिवेंद्रराजे भोसले 21,759 मते.

– कराड दक्षिण : दहाव्या फेरीअखेर पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर. अतुल भोसले 20933, पृथ्वीराज चव्हाण 27313, उदयसिंह पाटिल 12433 मते. 

– न्हावरे-शिरूर : चौदाव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. अशोक पवार २२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अशोक पवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून, बाबुराव पाचर्णे यांचा अतीआत्मविश्वा पराभवास कारणीभूत ठरला आहे.

– बारामतीत अजित पवार विजयी. सर्वच विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

– पुरंदर : कॉंग्रेस उमेदवार संजय जगताप विजयी. धक्कादायक निकाल हाती. शिवसेना नेते विजय शिवतारे यांचा पराभव. त्यामुळे शिवसेनेने बालेकिल्ला पुरंदर गमवला आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेचं लक्ष लागले होते. 

– पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक विजयी. सुमारे 35 हजार मतांनी विजयी. 

– खेड-आळंदी : दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) 26,642 मतांनी आघाडीवर.

– कणकवली-देवगड मतदारसंघातून नितेश राणे यांनी मारली बाजी

– मावळातून राष्ट्रवादीचे सुनील शेळके 1 लाख 16 हजार मतांनी विजयी

 – काँग्रेसचे अशोक चव्हाण भोकरमधून विजयी. 

– बारामती – एकविसाव्या फेरीअखेर अजित पवार १ लाख ३३ हजार ३३१ मतांनी आघाडीवर.

– सांगली पलूस कडेगाव : विश्वजीत कदम (काँग्रेस) विजयी

– चिपळूण : शेखर निकम (राष्ट्रवादी काॅग्रेस) विजयी

– शिंदखेडा : जयकुमार रावळ (भाजप) विजयी

–  पुणे : हडपसरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे 7500 हजार मतांनी विजयी. 

– आंबेगाव : पंधराव्या फेरीअखेर दिलीप वळसे पाटील 37 हजार 767 मतांनी आघाडीवर. वळसे पाटील 76,005 मते,  बाणखेले 38942 मते. 

– भोर : चौदाव्या फेरीअखेर कुलदीप कोंडे यांची १०५० मतांनी आघाडी. संग्राम थोपटे आणि कोंडे यांच्यात काट्याची टक्कर सुरु.  संग्राम थोपटे यांना ५७,९९६ आणि कुलदिप कोंडे ५९,०४७ मते.

– जुन्नर : अकराव्या फेरीअखेर अतुल बेनके यांची 4,898 मतांनी आघाडी. बेनके 30640, सोनवणे 25742 तर बुचके 19876 मते मिळाली आहेत. 

– इंदापूर : दत्तात्रय भरणे १४ हजार मतांनी आघाडीवर. हर्षवर्धन पाटलांना धक्का बसणार?

– कसबा : चौदाव्या फेरीअखेर मुक्ता टिळक यांना 54 हजार 485 मते तर अरविंद शिंदे 29 हजार 86 मते.

– कल्याण ग्रामीणमध्ये आठव्या फेरीअंती मनसेच्या राजू पाटील यांची आघाडी घटली. पाटील फक्त ८३० मतांनी आघाडीवर. 

– खडकवासला : एकोणिसाव्या फेरीअखेर सचिन दोडके यांची 1 हजार मतांनी आघाडी. दोडके 97558 मते तर भीमराव तापकीर 96,481

– बारामती : सतराव्या फेरीअखेर अजित पवार १ लाख ०८,७८२ मतांनी आघाडीवर.

– पर्वती : माधुरी मिसाळ यांची 11, 522 मतांनी आघाडी. मिसाळ (युती) 38075, अश्‍विनी कदम (आघाडी) 26553, ऋषिकेश नांगरे-पाटील (वंचित बहुजन आघाडी) 4087, शतायु भगळे (बहुजन मुक्ती पार्टी) 394, संदीप सोनवणे (आप) 241, नोटा 1533 मते.

– इंदापूर : १२ वी फेरी दत्तात्रय भरणे ९७६० मतानी आघाडीवर.

–  जुन्नर : अतुल बेनके 3957 मतांनी आघाडीवर.

– खडकवासला : चुरशीची लढत २० व्या फेरी अखेर २,००० मतांनी भीमराव तापकीर आघाडीवर. तापकीर यांना १,०५,९२८ तर दोडके यांना १,०३,७४४ मते. 

– दौंड : आठव्या फेरीअखेर राहुल कुल यांना ६८४२ मतांची आघाडी. कुल यांना ४५,४२४ तर रमेश थोरात यांना ३,८५८ मते.

– बारामती : सोळाव्या फेरीअखेर अजित पवार १ लाख ०२,४५० मताने आघाडीवर.

– चंद्रपूर : दहाव्या फेरीनंतर अपक्ष उमेदवार जोरगेवार 15 हजार 300 मतांनी आघाडीवर

कोण कोण पिछाडीवर?
सोलापूर – प्रणिती शिंदे
परळी – पंकजा मुंडे
कर्जत जामखेड – राम शिंदे
बारामती – गोपीचंद पडळकर
नालासोपारा- क्षितीज ठाकूर 
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
नांदगाव – पंकज भुजबळ

पुणे – बाळा भेगडे

– भोर : संग्राम थोपटे यांची ९२९ मतांची आघाडी. थोपटे यांना ४८,४३७ आणि कुलदिप कोंडे ४७५०८ मते.

दुसऱ्या फेरीअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 8398 मतांनी आघाडीवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान आहे.

– कणकवली : नितेश राणे 16 हजार 949 मतांनी आघाडीवर.

– बारामती : पंधराव्या फेरीअखेर अजित पवार ९७,०७६ मताने आघाडीवर.

– हातकणंगले : काँग्रेसचे राजीव आवळे 2,190 मतांनी आघडीवर. जनसुराज्य पक्षाचे अशोक माने, शिवसेना उमेदवार सुजित मिंचेकर पिछाडीवर

– कोल्हापूर दक्षिण : काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील 11 हजार मतांनी आघाडीवर. भाजपचे अमल महाडिक पिछाडीवर. 

– पुरंदर : धक्कादायक निकाल हाती. शिवसेना नेते विजय शिवतारे हे पराभवाच्या छायेत. कॉंग्रेस उमेदवार संजय जगताप यांनी तब्बल ११ हजार मतांनी आघाडी घेतली. त्यामुळे शिवसेना पुरंदर हा बालेकिल्ला गमवणार असल्याचं दिसत आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेचं लक्ष लागले होते. 

–  अकराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे अॅड. अशोक पवार 19 हजार मतांनी आघाडीवर.

– बारामती : तेराव्या फेरीअखेर अजित पवार ९०,६६० मताने आघाडीवर.

– अकराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार १५,००० मतांनी पुढे

– कोपरगाव : चौथ्या फेरीत आशुतोष काळे (राष्ट्रवादी) 1448 मताने आघाडीवर. आशुतोष काळे यांना 20799 मते, स्नेहलता कोल्हे (भाजप) 19351 मते, राजेश परजणे (अपक्ष) 2098 मते, विजय वहाडणे (अपक्ष) 491 मते, अशोक गायकवाड (वंचित) 807.

– कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक 28 हजारांनी आघाडीवर. 

– सातारा लोकभा पोटनिवडणूक : उदयनराजे भोसले 81 हजार मतांनी पिछाडीवर. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांची विजयाकडे वाटचाल. 

– मुंबई : भाजपचे सन्मानचे हंगामी कार्यालय सजवण्याची तयारी सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. 

– इंदापूर : नवव्या फेरीअंती ४६०० मतांनी राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आघाडीवर. 

–  पुणे : शिवाजीनगर सहाव्या फेरीअखेर सिध्दार्थ शिरोळे 2,447 मतांनी आघाडीवर. शिरोळे यांना 17762 मते तर बहिरट यांना 15315 मते.

– दहाव्या फेरीअखेर कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांनी 20 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. मुक्ता टिळक यांना 41 हजार 448 मते, काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना 20 हजार 679 मते मिळाली आहे. 

– खेड-आळंदी : बाराव्या फेरीअखेर दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) 5862 मतांनी आघाडी कायम. 

–  पुणे : चौथ्या फेरीनंतर काेथरुडमधून चंद्रकांत पाटील १२ हजाराने आघाडीवर. 

– विधानसभेचा पहिला निकाल विजय कुमार गावित नंदुरबारमधून विजयी. 

– सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई आर.आर. पाटील ४२ हजार ११४ मतांनी विक्रमी आघाडीवर.  

– इंदापूर : दत्तात्रय भरणे सातव्या फेरीअखेर ४,३०० मतांनी आघाडीवर. भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये चुरशीची लढत.

– बारामती : अकराव्या फेरीअखेर अजित पवार ७०,९७७ मताने आघाडीवर.

– खेड-आळंदी : दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) 5403 मतांनी आघाडीवर.

फेरीअखेर एकूण मते :

सुरेश गोरे (शिवसेना) :18877

दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) : 31656

अतुल देशमुख (अपक्ष) : 26253

– पर्वती : पाचवी फेरीअखेर माधुरी मिसाळ (युती) 21934, अश्‍विनी कदम (आघाडी) 14495, संदीप सोनवणे (आप) 138, ऋषिकेश नांगरे-पाटील (वंचित बहुजन आघाडी) 3346 तर नोटा 836 मते. 

मतमोजणीदरम्यान नाशिकमध्ये गोंधळ; मशीन बदलल्याचा काँग्रेसचा आरोप. 

– तिसऱ्या फेरी अखेरीस मनसेचे कल्याण ग्रामीणमधील उमेदवार राजू पाटील यांची तब्बल ३ हजार २७७ मतांची आघाडी. मनसेच्या राजू पाटील यांना १९ हजार ६२९ तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना १६ हजार ३५२ मते मिळाली आहेत.

– परळी : धनजंय मुंडे ९,६३८ मतांनी आघाडीवर. 

– महाराष्ट्रात 99 मतदारसंघात भाजप आघाडीवर. तर शिवसेना 60 आणि राष्ट्रवादी 48 मतदारसंघात आघाडीवर. 

– रोहित पवारांनी आघाडी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गेटबाहेर जल्लोष. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा. सध्या आठव्या फेरीत रोहित पवारांना 12 हजारांची आघाडी. 

– हडपसर : नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांची सुमारे 3500 मतांनी आघाडी घेतली. तुपे यांना नवव्या फेरीअखेर 43 हजार तर भाजपचे योगेश टिळेकर यांना सुमारे 40 हजार मते मिळाली. 

– दौंड : पाचव्या फेरीअखेर रमेश थोरात यांची १८४६ मतांनी आघाडी. यामुळे राहुल कुल यांची पीछेहाट, ८१८४ वरून कमी होऊन ६३४३ मते झाले आहे.

– माढा : अकराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे ३१,०१२ मतांनी आघाडीवर. 

– शिवसेनेचे विजय शिवतारे पुरंदरमधून तब्बल ४ हजार मतांनी पिछाडीवर.

– बारामती : नवव्या फेरीअखेर अजित पवार ५८,४८३ मताने आघाडीवर.

– इंदापूर : सहाव्या फेरीअंती २७०० मतांनी दत्तात्रय भरणे आघाडीवर. 

– महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांची १०० मतांनी आघाडी. तापकीर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्यात चुरशीची लढत सुरु. 

– कॅन्टोन्मेंट : मतमोजणी पहिल्या फेरीनंतर थांबवण्यात आली. काही ईव्हीएम मशीन सील नसल्याने कॉंग्रेसने आक्षेप घेतला. यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी मतमोजणीच्या ठिकाणी पोहचले असून मतमोजणी थांबवण्यात आली. दरम्यान, पहिल्या फेरी अखेर सुनील कांबळे 300 मतांनी आघाडीवर आहेत.

– बारामती : सातव्या फेरीअखेर अजित पवार ४३,४७७ मताने आघाडीवर. 

– आंबेगाव दिलीप वळसे पाटील नववी फेरीअखेर 22,638 मतांनी आघाडीवर. 

– पुरंदर : काँग्रेसचे संजय जगताप यांना दहाव्या फेरीअखेर ७९२४ने आघाडी.

– सातव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार ४९८२ पुढे. 

– दुसऱ्या फेरीअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान आहे.

– ऐरोली : भाजपाचे गणेश नाईक १० हजार ४७२ मतांनी आघाडीवर. चौथ्या फेरी अखेरीस नाईक यांना १४ हजार ९३१, मनसेच्या निलेश बाणखिले यांना ४ हजार ४५९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश शिंदे यांना ३ हजार ४२५ मतं.

–  खेड-आळंदी : दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) 4068 मतांनी आघाडीवर

सलग सहाव्या फेरीत धनंजय मुंडे आघाडीवर. पंकजा मुंडेंना धक्का बसणार? 

– पर्वती : चौथी फेरी अखेर माधुरी मिसाळ 16736 तर अश्विनी कदम 11 हजार 713 मते. मिसाळ 5 हजार मतांनी पुढे

– पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा विधानसभा मतदारंसघातून मोठी आघाडी. दहाव्या फेरीनंतर जवळपास १५ हजार ५०० मतांची आघाडी मिळाली आहे.

– वडगावशेरी : तिसऱ्या फेरीअखेर सुनिल टिंगरे 19897 तर जगदीश मुळीक 13642 मते. 

– जुन्नर : चौथी फेरीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अतुल बेनके 2033 मतांनी आघाडीवर. महायुतीचे शरद सोनावणे 9126, अपक्ष आशाताई बूचके 6997 मते. 

महाराष्ट्रात 75 मतदारसंघात भाजप आघाडीवर. तर शिवसेना 47 आणि राष्ट्रवादी 43 मतदारसंघात आघाडीवर. 

– कोपरगाव : निवडणुकीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे आशुतोष काळे 494 मताने आघाडीवर. स्नेहलता कोल्हे (भाजप) 4963 मते, राजेश परजणे (अपक्ष) 411 मते, विजय वहाडणे (अपक्ष) 177 मते, नोटा 95 मते. 

– शिरूर :  चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे अॅड.अशोक पवारांची 12246 मतांनी आघडी तर बाबुराव पाचर्णे 11815 मते.  शिरूर-हवेलीत चुरशीची लढत. 

– चौथी फेरीत अतुल बेनके २२०० मतांनी आघाडीवर. 

– बारामती : पाचव्या फेरीअखेर अजित पवार ३१,५४८ मताने आघाडीवर. 

– शिरूर- हवेली : राष्ट्रवादीचे अॅड.अशोक पवारांची पाचारणेंच्या बालेकिल्ल्यात १६०० मतांनी आघाडीवर. 

–  खेड-आळंदी : राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते 3721 मतांनी आघाडीवर. तर शिवसेनेचे सुरेश गोरे यांना 7331 मते.

जुन्नर : तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे अतुल बेनकेंची १८६३ आघाडी.

– इंदापूर : तिसऱ्या फेरीअंती हर्षवर्धन पाटील यांची ९२१ मतांनी आघाडी. 

– भोर : राष्ट्रवादीचे संग्राम थोपटे तिसऱ्या फेरीत १०२६ मतांनी आघाडीवर. थोपटे १३९८१ तर कुलदिप १२९५५ मते

– बारामतीत : चौथ्या फेरीअखेर अजित पवार २५, ५५२ मताने आघाडीवर तर गोपीचंद पडळकर यांना २४७० मते

दुसऱ्या फेरीअंती भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील १०५४ मतांनी आघाडीवर. 

– औसा : मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार 5 हजार मतांनी आघाडीवर. 

– आंबेगाव : सहावी फेरी दिलीप वळसे पाटील 15,342 मतांनी आघाडीवर

– खेड-आळंदी : पाचव्या फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते 4694 मतांनी आघाडीवर. शिवसेनेचे सुरेश गोरे 6926 तर अपक्ष उमेदवारअतुल देशमुख यांना 10432 मते. 

– अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीवरील उमेदवार (दुसरी फेरी)
राष्ट्रवादी काँग्रेस- ८, काँग्रेस- २, भाजप- २
कर्जत जामखेड – रोहित पवार (राष्ट्रवादी)
पारनेर- निलेश लंके (राष्ट्रवादी)
श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
नगर शहर – संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
राहुरी- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
शेवगाव- प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी)
नेवासा- शंकरराव गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत)
शिर्डी- राधाकृष्ण विखे (भाजप)
संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
कोपरगाव – अशुतोष काळे (राष्ट्रवादी)
अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी)
श्रीरामपूर- लहू कानडे (काँग्रेस)

– खेड-आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते 3919 मतांनी आघाडीवर तर

– नंदुरबार : विजयकुमार गावित 11 हजार मतांनी आघाडीवर. 

– भोकर : अशोक चव्हाण 6614 मतांनी आघाडीवर. 

– उदयनराजे, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे पिछाडीवर. 

– येवल्यात मतमोजणीत तांत्रिक बिघाड. 

– पुणे कॅंटोन्मेंट : महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे ३०० मतांनी आघाडी. 

– राज्यात मनसेला दोन ठिकाणी आघाडी मिळाली आहे. कल्याण पूर्वमधून राजू पाटील आणि डोंबिवलीतून मंदार हळबे हे आघाडीवर आहेत. 

– इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ : अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे आघाडीवर तर भाजपचे सुरेश हाळवणकर पिछाडीवर. 

– कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ आघाडीवर तर सेनेचे उमेदवार संजय घाटगे आणि अपक्ष समरजित घाटगे पिछाडीवर. 

– महाराष्ट्रात २१ मतदारसंघात भाजप आघाडीवर. तर शिवसेना १५, काँग्रेस ५ आणि राष्ट्रवादी १३ मतदारसंघात आघाडीवर. 

– राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची 4213 मतांनी आघाडी. तर महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना 3669 मते. 

पुरंदर : चौथी फेरी पूर्ण. शिवसेनेचे विजय शिवतारे १३० मतांनी पिछाडीवर. 

– पुणे : पर्वतीमधून भाजप उमेदवार माधुरी मिसाळ १ हजार मतांनी पुढे

– कोरेगाव (जि.सातारा) येथून शशिकांत शिंदे ९०० मतांनी आघाडीवर.

– कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक आघाडीवर. टिळक यांनी 859 मतांची आघाडी घेतली आहे. 

– चौथ्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांची 4,374 मतांनी आघाडीवर. 

खडकवासला (पुणे) – पहिली फेरी पूर्ण. पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे उमेवार सचिन दोडके यांना 6,948 तर महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांना 3,416 मते. 

– शिर्डी : पहिली फेरी पूर्ण. भाजप उमदेवार राधाकृष्ण विखे-पाटील यांची ६,३१३ मतांनी आघाडी.

– पुरंदर : ३ फेऱ्या पूर्ण. शिवसेना विजय शिवतारेंची १४०० मतांनी आघाडी. 

– कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १२०० मतांनी आघाडीवर. 

– इंदापूर :  पहिल्या फेरीत भाजप यूएमद्वार हर्षवर्धन पाटील आघडीवर. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांचे कडवे आव्हान.

– लोकसभा पोटनिवडणूक : साताऱ्यातून भाजप उमेदवार उदयन राजे भोसले पिछाडीवर. तर राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांची १०९८ मतांनी आघाडी.  

 – येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांची आघाडी. 

– बारामतीमधून अजित पवारांची आघाडी. भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर पिछाडीवर.

– रायगड – श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर आहेत. त्या १ हजार ७५३ मतांनी आघाडीवर आहेत. 

इंदापूर- पहिल्या फेरीत हर्षवर्धन पाटील यांना 813 मतांची आघाडी

– कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील आघाडीवर. 

– भोकर : अशोक चव्हाण 1700 मतांनी आघाडीवर

–  वरळीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 7020 मतांनी आघाडीवर. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे सुरेश माने यांचे आव्हान. 

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान आहे.

– जामनेरमधून गिरीश महाजनांची आघाडी 

– कणकवलीतून नितेश राणे आघाडीवर

– परळीतून धनंजय मुंडेंची एक हजार मतांनी आघाडी. 

– कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांची सहा हजारांनी आघाडी. त्यांच्यासमोर भाजप उमेदवार राम शिंदे यांचे आव्हान. तर शिर्डीतून गिरीश महाजनांची आघाडी. 

– पुण्यात भाजप उमेदवार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर

– कोथरुडमधून भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आघाडीवर

– 288 मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात 

 

Leave A Reply

Your email address will not be published.