पुणे – थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने आज प्रसिद्ध केले. त्यानुसार या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 ऑगस्टपर्यंत आहे.
दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. मात्र थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू झाली नव्हती. ही प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी होत होती. त्यानंतर आज तंत्रशिक्षण विभागाने थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले.
थेट द्वितीय पदविका प्रवेशाचे वेळापत्रक
* अर्ज करण्याची मुदत : 17 ते 27 ऑगस्ट
* अर्ज भरल्याची निश्चिती : 18 ते 27 ऑगस्ट
* ताप्तुरती गुणवत्ता यादी : 30 ऑगस्ट
* यादीवर हरकतीसाठी मुदत : 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर
* अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 4 सप्टेंबर
बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय उत्तीर्ण विद्यार्थी या पदविका अभ्यासक्रमासाठी पात्र राहील. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना 400 रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना 300 रुपये अर्जाचे शुल्क आहे. या अभ्यासक्रमासाठी सर्वात प्रथम नोंदणी करावे लागणार आहे. त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून, त्याचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे कागदपत्राची तपासणीही प्रत्यक्ष सुविधा केंद्र अथवा ऑनलाईनद्वारे अशा दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. त्यानुसार विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करोवत, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.