दुबई – सलामीवीर फाफ डुप्लेसीसच्या 86 धावांच्या जोरावर आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने केकेआरला विजयासाठी 193 रनचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने 20 षटकांमध्ये 3 गडी गमावून 192 धावा केल्या.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी कऱण्याचा निर्णय़ घेतला. पण चेन्नईच्या फलंदाजानी दमदार फलंदाजी करत 192 धावांपर्यंत मजल मारली.
चेन्नईकडून फलंदाजीत फाफ डुप्लेसिसने 59 चेंडूत 86 धावांची खेळी केली, यामध्ये 7 चौकार आणि 3 षटकरांचा समावेश होता, तर मोईन अली याने 20 चेंडूमध्ये नाबाद 37 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने 15 चेंडूमध्ये 31 धावा केल्या, तर ऋतुराज गायकवाड 27 चेंडूमध्ये 32 धावा करून बाद झाला.
गोलंदाजीमध्ये कोलकात्याकडून सुनिल नरेन याने 2 आणि शिवम मावीला 1 गडी बाद करण्यात यश आलं. सुनील नरेनने 4 षटकांत 26 तर शिवम मावीने 4 षटकांत 32 धावा दिल्या.