न्यूयॉर्क : जगात सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात नवा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार आता लग्नापूर्वी शारीरिक संबंध आणि लग्नाशिवाय लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. आज इंडोनेशियन संसदेने विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि लिव्ह-इन संबंधांना गुन्हेगार ठरवणारा नवीन कायदा मंजूर केला. तसेच विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना एका वर्षाची शिक्षा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इंडोनेशिया सरकारचे हे पाऊल देशाच्या स्वातंत्र्याला मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी, अनेकांनी या कायद्यातील सुधारणांना विरोध केला, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम-बहुसंख्य राष्ट्र कट्टरतावादाकडे वळल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
इंडोनेशियाच्या या नवीन विधेयकानुसार, जर एखादी व्यक्ती अशा व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवते. जे एकमेकांचे पती किंवा पत्नी नसतील. तर त्याला या व्याभिचारासाठी 1 वर्ष सश्रम कारावास किंवा श्रेणी II अंतर्गत मोठ्या दंडाची शिक्षा दिली जाणार आहे.
माध्यमातील रिपोर्ट्सनुसार हा कायदा मंजूर झाल्यानंतर, हा निर्णय इंडोनेशियातील नागरिक आणि परदेशी यांना लागू होईल. या प्रकरणात शिक्षा तेव्हाच होईल जेव्हा अधिकाऱ्यांकडे संपूर्ण पुराव्यानिशी तक्रार केली जाईल आणि गुन्हा सिद्ध होईल.