पणजी : आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचे अर्थात “इफ्फी महोत्सव-2019” गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सुरु झाला असून, यंदा या महोत्सवाचे हे 50 वे वर्ष आहे. हा महोत्सव गोव्यातील पणजी इथे बांबोलिम येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
दरम्यान, नुकतंच इफ्फी च्या उद्घाटन सोहळ्यात सुपरस्टार रजनीकांत आणि बिग बी अमिताभ बच्चन आले आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता करण जोहर या सोहळ्याचे निवेदन करत आहे.