खोटारडेपणा मान्य करा तोपर्यंत चर्चा नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेनेच पक्षप्रमुख ‘उद्धव ठाकरे’ यांनी पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे 

 • “गेल्या ५ वर्षांत आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकास कामांच्या आड राजकारण येऊ दिलं नाही.”
 • आम्ही जर भाजपसोबत नसतो तर ते विकास करू शकले नसते
 • आज शिवसेना प्रमुखांच्या मुलावरती खोटे आरोप झाले
 • अमित शहांचा संदर्भ देऊन आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला गेला, पण जनतेला सर्व माहिती आहे कोण खोटं  बोलतय
 • अमित शहा, देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा युतीची चर्चा थांबली त्याच कारण मी होतो
 • शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ,असे ते म्हणाले होते. परंतु मला ते मान्य नव्हतं त्यामुळे चर्चा थांबवली आणि मी तेथून निघून आलो.
 • मी खोटा नसून भाजप खोटे आहे
 • मुख्यमंत्रीपदाबाबत तेव्हाच ठरलं होत. तेव्हा फडणवीस म्हणाले हे आता जाहीर झालं तर मला पक्षांतर्गत प्रॉब्लेम होईल
 • लोकसभेत आमच्या गळ्यात अवजड मंत्रिपद बांधलं
 • मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही ते गेल्या पाच वर्षात सतत खोटं बोलत आहेत
 • मी तुमची अडचण समजून घेतली हा माझा गुन्हा का?
 • साताऱ्याची जागा शिवसेनेला दिलेली ती उदयनराजेंसाठी सोडली ते विसरलेत का
 • मी मोदींवर टीका केली नाही आजवर मोदींवर टीका करणारे उदयनराजे त्यांना चालतात
 • शब्द देऊन फिरवणारी वृत्ती आमची नाही
 • सत्तेची लालसा एवढ्या खालच्या स्तराला जाईल वाटलं नव्हतं
 • गोवा,कर्नाटक, मणिपूरमध्ये तुम्ही कसे सरकार आणले ते आम्हाला माहित आहे
 • मला खोट ठरवणाऱ्या लोकांशी मी अजिबात बोलणार नाही
 • संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे, आता रब्बी हंगाम सुरू होईल पण अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.
 • मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिल आहे, कि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते वचन मी पाळणार म्हणजे पाळणाराचं. त्यासाठी मला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही.
 • लोकसभेला जे ठरलं त्यापेक्षा सुईच्या टोकाइतकं सुद्धा मला नको
 • मला संघाला विचारायचं आहे, खोटं बोलणारे लोक तुम्हाला कसे चालतात. असा खोटारडेपणा हिंदुत्वात खपवून घेणार नाही.
 • हिंदुत्वाचा बुरखा घालून एखादा पक्ष खोटं बोलतो
 • महाराष्ट्राच्या जनतेचा जेवढा शिवसेनाप्रमुखांच्या परिवारावर विश्वास आहे तेवढा अमित शहा आणि कंपनीवर नाही.
 • राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतीही चर्चा नाही
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×