अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे  

– २०२० पर्यंत गृहप्रकल्पाची नोंदणी केल्यास आयकरात सवलत.

– ४० हजारापर्यंतच्या बँकेत ठेवलेल्या रकमेवर आता टीडीएस लागणार नाही.

– ५ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पूर्ण कर सवलत मिळेल. दीड लाखापर्यंतच्या बचतही करमुक्त. असे एकूण ६.५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना मोदी सरकारचा दिलासा.

– पशूपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे २ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणार.

– नोकरदारांना निराशा, जीएसटीतून सवलत नाही. छोट्या व्यापाऱ्यांना मात्र जीएसटीत सवलत.

– इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, मध्यमवर्गीयांना मोदी सरकारकडून दिलासा नाही.

– घर खरेदी करणाऱ्यांसाठी जीएसटी कमी करण्याचा विचार सुरु. यासंदर्भातला निर्णय जीएसटी परिषद घेईल.

– यंदा १२ लाख कोटी रुपये कर स्वरूपात मिळाले. करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ.

– मनोरंजन क्षेत्रासाठी सर्व परवानग्या एकाच खिडकीवर.

– महामार्ग निर्मितीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर. दररोज देशात 27 किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती.

– येत्या ५ वर्षात १ लाख गावे डिजिटल करणार.

– रेल्वेसाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद. वंदे भारत हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात.

– संरक्षण खात्यासाठी ३ लाख कोटींहून अधिक तरतूद. ओआरओपीसाठी ३५ हजार कोटींचे कर्ज.

– गर्भवती महिलांना २६ आठवड्यांची पगारी सुट्टी.

– नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत अडीच लाखांवरून ६ लाखांपर्यंत.

– पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित कामगारांना दरमहा ३ हजार रुपये बोनस. निवृत्त कामगारांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन. ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आली.

– २१ हजार पगार असलेल्या असंघटित कामगारांना ७ हजार बोनस देण्याची घोषणा. १० कोटी असंघटित कामगारांना लाभ.

– गाईंसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना आणणार. गाईंच्या प्रजाती सुधारणार

– पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी २ हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार थेट बँक खात्यात जमा होणार. पियूष गोयल यांची घोषणा. तर ५ एकरपर्यंत दरमहा ५०० रुपये खात्यात. १ डिसेंबर २०१८ पासून योजनेची अंमलबजावणीची सुरुवात होणार असून ३ आठवड्यात रक्कम जमा होणार

– रियल इस्टेटमध्ये पारदर्शकता आली. रेरासारखे कायदे आणले, रेरामुळे बेनामी संपत्ती असणाऱ्यांचे पितळ उघडे पडले.

– राज्यांना आधीच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळणार अशी घोषणाही पियूष गोयल यांनी केली.

– आम्ही सौभाग्य योजना आणली, मार्च २०१९ पर्यंत सगळ्या कुटुंबांच्या घरात वीज मिळणार.

– १ लाख ५३ हजार घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बनविण्यात आली.

– स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद.

– २०२० पर्यंत प्रत्येकाला घर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार.

– जीएसटी लागू करणे अर्थव्यवस्थेसाठी मोठे पाऊल.

– आमच्या सरकारने महागाईचा कंबरडे मोडले.

– गेल्या पाच वर्षात देश प्रगतीपथावर. भारत वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था.

– अंतरिम बजेटच्या आधी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १०६ अंकांनी सुधारला.

Leave A Reply

Your email address will not be published.