LIVE: महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा, दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी -शरद पवार  

प्रातिनिधिक छायाचित्र

नांदेड: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष यांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग आज नांदेड येथून फुंकले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा आज बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये इंदिरा गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी (कवाडे), शेकाप, आरपीआय(गवई गट) यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. शहरात महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा होत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संबोधन करत आहेत.

शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
-हे सरकार फक्त 56 इंचाच्या छातीच्या गप्पा मारतं : शरद पवार
-शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र मोदींना वेळ नाही, नोटाबंदीमुळे शेकडो जणांचे जीव गेले, यालाही मोदीच जबाबदार : शरद पवार
-जवान शहीद झाले असताना देशाचे पंतप्रधान यवतमाळमध्ये होते
-दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी
-जवानांसाठी भाजप सरकारन काय केल

 

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/769710113406020/

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)