साहित्यविश्‍व : “शक्तीदायी माणसांची “देखणी ही पावलं’

संदीप खाडे

माणसामाणसांमध्ये अंतर असण्याचे कारण हेच की, कुणामध्ये नि:सीम आत्मविश्‍वास असतो आणि कुणामध्ये तो नसतो. आत्मविश्‍वास सर्वकाही करू शकतो याचे मुर्तिमंत उदाहारण म्हणजे ऍड. प्रमोद आडकर यांनी लिहिलेले “देखणी ही पावलं’ हे पुस्तक होय. या पुस्तकामध्ये आडकर यांना ज्या ज्या महनीय व्यक्तींचा सहवास लाभला त्यांच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल लिहिले आहे. मानवजातीचा इतिहास पाहिला असता आपल्याला असे दिसून येते की, समस्त थोर स्त्री-पुरूषांच्या जीवनात सर्वांहून बलशाली अशी प्रेरक शक्ती जर कोणती असेल तर ती म्हणजे आत्मविश्‍वास. “आम्ही यशस्वी होणारच’ ही उपजत जाणीव या पुस्तकांच्या लेखांमधून आपणाला पहावयास मिळते. “देखणी ही पावलं’ या पुस्तकात एकूण 17 लेख आहे.

या मध्ये “स्नेहालयचा प्रारंभ घरापासून’ या लेखात संस्थेचा प्रारंभ करणारे डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या पासून सुरू होतो. “कार्यकर्ता व्रताचा आदर्श – अशोक कुरापाटी’ या लेखामध्ये अहमदनगरमध्ये जन्मलेले अशोक कुरापाटी यांचा जीवनप्रवास उलगडला आहे. “आधुनिक काळातील द्रष्टा तपस्वी’ हा डॉ. पी. डी. पाटील यांच्यावरील लेख आहे. “एक आदर्श विचारपीठ’ हा लेख डॉ. शिवाजीराव कदम यांच्या जीवनावर लिहिला आहे. भारती विद्यापीठात प्राध्यापक ते कुलपती या पदापर्यंत मारलेली मजल या लेखामध्ये दिली आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे डॉ. कदम यांचा दिलदारपणा या लेखातून उलगडत जातो.

“कर्तव्यदक्ष संवेदनशील पोलीस अधिकारी’ हा लेख डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्यावरील आहे. कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बलतेबद्दल सुस्कारे टाकणारे अनेक जण असतात पण विठ्ठलराव जाधव हे त्यांच्यापेक्षा निराळे होते. “द्रष्टा ज्ञानयात्री’ या लेखात डॉ. सुधाकर जाधवर यांचा जीवनाचा वेध घेण्यात आला आहे. बिकट परिस्थितीचा सामाना करत ते स्वत:च अनेक शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयांची स्थापना करणारे डॉ. सुधाकर जाधवर यांचा प्रवास या लेखात उलगडण्यात आला आहे. “नि:स्वार्थी ऋजू व्यक्तिमत्त्वाची माऊली’ या लेखात प्रतिभाताई शाहू मोडक यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. “निष्ठावान धन्वंतरी’ या लेखात डॉ. धनंजय केळकर यांचा जीवनप्रवास आहे. देश-विदेशात कामानिमित्त केलेले वास्तव्य आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मेडीकल डायरेक्‍टरपर्यंत मारलेली मजल या सर्व बाबींचा उलगडा या लेखात मांडण्यात आला आहे.

“अथश्री’ ज्येष्ठांच्या हक्काचा गृहप्रकल्प’ या लेखात परांजपे गृहप्रकल्पाचे संस्थापक श्रीकांत व शशांक परांजपे यांचा प्रवास या लेखातून उलगडण्यात आला आहे. “ध्यास कौशल्य विद्यापीठाचा’ या लेखात विश्‍वेश कुलकर्णी यांचा जीवनप्रवास शुन्यातून विश्‍वाला गवसणी घालण्यासरखा आहे. “पालवी’ : सामाजिक कृतज्ञतेने बहरलेला वटवृक्ष’ या लेखात एचआयव्ही ग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या मंगलाताई शहा यांच्या कार्याचा परामर्श घेण्यात आला आहे. लातुरमध्ये जन्मलेला आणि पुण्यात शिक्षण घेतलेला हा तरूण देशातील उद्योगजगापासून ते परदेशातील उद्योगजगात वावर आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सचिन ईटकर यांच्या जीवनाचा आलेख यात देण्यात आला आहे. संपूर्ण पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य झाले आहे, हे विशेष.

Leave A Reply

Your email address will not be published.