राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – मी भाग्यवान माणूस आहे, निमगावच्या खंडोबा मंदिरात श्री खंडेरायाची मूर्ती बसविण्याचे भाग्य गायकवाड सरकारनंतर दिलीप मोहितेंना लाभले आहे. 400 पेक्षा जास्त वर्षांनंतर हा मान मला मिळाला आहे.
म्हणून निमगावकरांना मी लाख लाख धन्यवाद देतो. खर्या अर्थाने खंडेराया मला पावलाय, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
जनसंवाद दौर्यानिमित्ताने कारभारीवस्ती (निमगाव, ता. खेड) येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन, उद्घाटन रविवारी (दि. 6) करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला उपाध्यक्ष कांचन ढमाले, तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव,
खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, संचालक जयसिंग भोगाडे, पप्पू टोपे, कमल कड, जिल्हा परिषद माजी सदस्य मंगल चांभारे, निमगाव खंडोबा यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष बबन शिंदे,
आरपीआय माथाडी कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनवणे, पस माजी सभापती सुरेश शिंदे, महाराजा कबड्डी संघाचे राजकुमार राऊत, वैशाली जाधव, नंदा कड, अॅड. मनीषा टाकळकर, सुजाता पचपिंड, महेंद्र काळे, विनायक राऊत, काळूराम भगत, विक्रम काळे, इंदुमती शिंदे, कल्याण शिंदे, ऋतिका शिंदे, कांचन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरगोस निधी दिला आहे. राज्यात नागरिकांना सरकार सर्व प्रकारची मोठी मदत करीत आहे. निमगाव गावासाठी मोठा निधी दिला आहे.
येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विकासाला व सुशोभीकरणाला जास्तीचा निधी उपलब्ध केला जाईल. मी सेवेकरी माणूस आहे.
जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी खंडेरायांनी द्यावी आणि निमगावकरांनी मला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत शिंदे यांनी तर दादा शिंदे यांनी आभार मानले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून निमगावात अनेक विकास कामे झाली आहेत, होत आहेत.
दिलीप मोहिते पाटीलच पुन्हा आमदार होणार आहेत आणि त्यांना चांगले मंत्रिपद मिळेल. दिलीप मोहिते पाटील हे शिक्षणमंत्री अथवा गृहमंत्री होतील असा विश्वास आहे. – बबन शिंदे, अध्यक्ष, उत्सव कमेटी,