लंडन – लिस्टर सिटीने बलाढ्य चेल्सीचा 1-0 असा पराभव करत एफए करंडकावर नाव कोरले. लिस्टर सिटीने क्लबच्या 137 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एफए विजेतेपदाला गवसणी घातली.
यौरी टिलेमान्स याने 63 व्या मिनिटाला केलेला गोल स्पर्धेच्या 149 वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरला. याआधी लिस्टर सिटीला चार वेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. 1969 साली त्यांनी अखेरच्या वेळी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
पहिल्या सत्रात लिस्टरला दुखापतग्रस्त जॉनी इव्हान्सची उणीव भासली. अखेर 63 व्या मिनिटाला चेल्सीच्या पारड्यात गोल केल्यानंतर टिलेमान्सने चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि गोल केला. टकेल यांनी बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण लिस्टरचा गोलरक्षक श्मेइटेलच्या भक्कम बचावासमोर त्यांना बरोबरी साधण्यात अपयश आले व त्यांना सामना गमवावा लागला.
लेव्हानोव्हस्कीची विक्रमाशी बरोबरी
बायर्न म्युनिकचा अव्वल खेळाडू रॉबर्ट लेव्हानोव्हस्की याने बुंडेसलीगा फुटबॉलमध्ये एका मोसमात 40 गोल करणाऱ्या विक्रमाशी बरोबरी साधली. लेव्हानोव्हस्कीने 26व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. लेव्हानोव्हस्कीने गेर्ड म्युलर याने 1972 साली केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळे बायर्नने फ्रेइबर्गविरुद्धची ही लढत 2-2 अशी बरोबरीत सोडवली.