108MP प्रायमरी कॅमेरा असणारे ‘हे’ 3 मोबाईल भारतात ‘लाँच’; किंमत तुमच्या बजेटमध्ये, जाणून घ्या सर्व ‘फिचर्स’

नवी दिल्ली – सध्या 108 MP कॅमेरा असणारे स्मार्ट फोन मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सुरुवातीला 108MP कॅमेरा असणारा सेन्सर हे फक्त प्रीमियम डिव्हाइस मध्येच उपलब्ध होते. परंतु आता भारतात ही 108MP कॅमेरा सेन्सर असणारे स्मार्ट फोन आपल्याला परवडतील अशा बजेटमध्ये सुद्धा मिळत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये फोनमध्ये 108 MP कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहेत.

Redmi Note 10 Pro Max

रेडमी नोट 10 प्रो मॅक्स
रेडमी नोट 10 प्रो मॅक्स या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपया पासून सुरू होती. यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे. त्या व्यतिरिक्त 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 5MP चा सुपर मायक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर सुद्धा दिला गेला आहे. तसेच या फोनमध्ये 6.67-इंच चा FHD+ Super AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. त्याचबरोबर 5020mAh ची बॅटरी सुद्धा आहे.

Xiaomi Mi 10i
शाओमी Mi 10i
शाओमी Mi 10i च्या रियर मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्राइमरी कॅमेरा  108MP Samsung HM2 सेंसर सोबत येतो. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा-वाइड कैमरा, 2MP चा मॅक्रो सेंसर आणि 2MP चा डेप्थ सेन्सरचा देखील समावेश आहे. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4820mAh ची आहे. हे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G चिपसेटच्या सोबत येते. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये पासून सुरू होते.

Xiaomi Mi 10T Pro

शाओमी Mi 10T Pro
शाओमीचा हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप बरोबर उपलब्ध आहे. याच्यामध्ये 108MP HMX सेंसर OIS सपोर्टच्या सोबत दिला गेला आहे. या शिवाय याच्यामध्ये 13MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 5MP चा मायक्रो सेंसर ही दिला गेला आहे. या स्मार्टफोनचा डिसप्ले6.67 इंचाचा आहे. त्याचबरोबर याचा रिफ्रेश रेट 144HZ चा आहे. याच्यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8650 चिपसेटच्या आणि 5000mAh ची बॅटरी आहे. या स्मार्ट फोनची सुरुवात 37,999 रुपये किमतीने होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.