पुणे: भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेसने विधानसभा २०१९ साठी उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप यादी जाहीर केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड उत्सुकतेत आहेत.
दरम्यान, उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
जयंत पाटील यांनी इस्लामपूर-वाळवा मधून तर चिपळूण मधून शेखर निकम यांनी अर्ज दाखल केले आहेत. मुरबाड मधून प्रमोद हिंदुराव, अमळनेर मधून अनिल भायदास पाटील आणि चोपडा मतदारसंघातून जगदीश वळवी यांनी अर्ज दाखल केले आहेत.