मुंबई – एमआयएमने साथ सोडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही विधासभेसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत २२ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तर आता १३३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ही यादी घोषित केली आहे. तर १३३ उमदेवारांची लवकरच यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी दोन यादी जाहीर केल्याने एमआयएम आणि वंचितची आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे. वंचितने कर्जत जामखेडमधून अरुण जाधव, लातूर शहरातून मनियार राजासाब, जगवमधून शेख शफीअबुल नबीशेख, शिवाजीनगर अनिल कुँहडे यासह २२ मतारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पुण्यातील जागेचाही समावेश आहे.
दरम्यान, विधानसभेच्या 288 जागा लढण्याची आमची ताकद असून इतर पक्षांमध्ये तसे दिसून येत नाही. म्हणूनच ते मैत्री करून निवडणूक लढवित असल्याचा टोला आंबेडकर यांनी शिवसेना-भाजपा तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला. आमच्या पक्षाचे मतदार वाढले असून त्याचा फायदा आम्हाला निवडणूकीत होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.