वयाच्या ३४ व्या वर्षी तिसऱ्यांदा होणार लीसा हेडन आई; असा झाला खुलासा…

मुंबई – अलीकडच्या काळात एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींकडे “गुड न्यूज’ ऐकायला मिळाली आहे. त्यामध्ये सर्वात अलीकडे लिसा हेडनचेही नाव ऐकायला मिळाले आहे. लिसा हेडन तिसऱ्यांदा आई बनणार आहे. स्वतः लिसा हेडननेच ही गोड बातमी आपल्या फॅन्सना दिली आहे. इन्स्टाग्रामवरच्या एका व्हिडिओ पोस्टमध्ये तिने आपण तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे आणि लवकरच आपल्या घरात एक नवीन पाहुणा येणार असल्याचे सांगितले आहे.

या व्हिडिओमध्ये लिसाचा मुलगा जॅक देखील दिसतो आहे. घरात नवीन पाहुणा येणार असल्याने तो आनंदीत झाला आहे. व्हिडिओमध्ये लिसा जॅकला जवळ बोलावते आणि ही बातमी सर्वांना सांगायला सांगते. जॅकदेखील आनंदाने आता मला एक सिस्टर येणार असे सांगतो. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लिसा हेडन आणि डिनो लालवाणी यांनी 2016 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये जॅकचा जन्म झाला. लिसाच्या दुसऱ्या मुलाचा जन्म गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झाला. आता यावर्षी जूनमध्ये लिसाचे तिसऱ्या अपत्याचा जन्म होईल. अलीकडेच अनुष्का शर्मा आणि अमृता राव यांनीदेखील आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आहे. तर करिना कपूर खानदेखील दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.